महाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

ड्रीम11मध्ये करोडपती झालेले पोलीस उपनिरीक्षक निलंबित ;ऑनलाइन सट्टा खेळल्याचा ठपका

पिंपरी (वास्तव संघर्ष) : ड्रीम-11 नावाच्या ऑनलाईन गेम खेळून मालमाल झालेल्या पिंपरी चिंचवड पोलिस दलातील पिएसआयची विभागीय चौकशी लावण्यात आली होती. या चौकशीत पिएसआय झेंडे दोषी आढळले असून त्यांना प्राथमिक चौकशी नंतर निलंबित करण्यात आले आहे .अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी सतीश माने यांनी दिली आहे.ही चौकशी  विभागीय  उपायुक्त बांगर यांचेकडे देण्यात आली आहे. असे देखील त्यांनी सांगितले.

ऑनलाईन गेम खेळणं चुकीचं आहे की ऑनलाईन गेमिंगवरच बंदी घालायला हवी असे प्रश्न निर्माण झाले आहेत. जर पीएसआयवर कारवाई झाली तर जिंकलेल्या दीड कोटीचे काय होणार याचीही चर्चा रंगली आहे.

ज्या ऑनलाईन खेळाची जाहिरात मोठं मोठे सेलीब्रेटी करतायत, आणि अशा गेम्स खेळण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली तर झेंडे किंवा प्रशासनातील इतर अधिकारी त्याला अपवाद कसे ठरू शकतात असा प्रश्न उपस्थित करत ,मुळात असे गेम्सवर बंदी का घातली गेली नाही? असा सवाल कायदेतज्ज्ञनी उपस्थित केलाय तर दूसरीकडे आपल्याला मिळालेल्या पैशातून घरकर्ज फेडणार असल्याचं झेंडे यांचं म्हणण आहे.आता सोमनाथ झेंडे यांच्यासोबत झालेल्या प्रकाराने राज्यातले इतरही पोलिसांनी धडा घेतिल आणि ड्रीम 11 सारखे ऍपच मोबाईलवरुन डिलीट करुन टाकले, तर आश्चर्य वाटणार नाही.

Share this: