क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

चाॅईस मोबाईल नंबरच्या नावावर व्यावसायिकाला ६५,५५४ रुपयांचा गंडा;आरोपीविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाकड (वास्तव संघर्ष) :चाॅईस मोबाईल नंबर विकत देण्याचे अमिष दाखवून एका भामटय़ांने वाकड येथील एका व्यावसायिकांकडून ६५,५५४ रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.15) रोजी उघडकीस आली असून या भामट्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर मनोहर जाधव (वय ४५ वर्षे , धंदा व्यवसाय, रा मु . पिंक सिटी , बंगला नंबर सी -११ , पी एस सी बँकेजवळ वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी शंकर जाधव यांना चाॅईस मोबाईल क्रमांक देतो, असे आमिष एकाने दाखविले. त्यासाठी त्याने ९ ४२२०८७५१२ वर मोबाईल नंबर ८६५७३०८४५५ वरुन एसएमएस तसेच फोन करुन अनोळखी इसमाने भारतीय एअरटेल सिमकार्ड या नावे लकी मोबाईल नंबरसाठी एक मेसेज पाठवुन तसेच कॉल करुन एक चॉईस नंबर घेणेसाठी फिर्यादीस VYSYA BANK AC .NO . २११२१७२०००००३८८२ या अकाउंटवर लबाडीच्या इराद्याने एकुण ६५,५५४.९ ० रुपये भरण्यास लावुन फिर्यादी शंकर जाधव यांची आर्थिक फसवणुक केली. पोलिसांनी अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Share this: