घरकुल परीसरात अवैध दारूचा साठा;आरोपीला चिखली पोलीसांनी केली अटक
चिखली (वास्तव संघर्ष) चिखलीतील घरकुल परीसरात अवैध दारूच्या बॉक्सचा साठा करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विदेशी दारुचा मद्यसाठा जप्त केला आहे. ही घटना आज (दि. 14) दुपारी संस्कार बिल्डिंग सी -१ घरकुल या सोसायटीचे समोर उघडकीस आली आहे.
हर्षल नितीन लेले (वय २८ वर्षे धंदा नोकरी रा . फ्लॅट नं . १०१ , बी / २५.निर्मल हौसिंग सोसायटी चिखली पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डिंग सी -१ घरकुल या सोसायटीच्या समोर सार्वजनिक रोडवर एका टाटा मॅजिक टेम्पोमध्ये देशी विदेशी दारुच्या बॉक्सचा साठा करुन त्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी हर्षल याची अंगझडती घेवुन त्याचे ताब्यातील टाटा मॅजिक टेम्पो व त्यामध्ये मिळुन आलेल्या प्रोव्ही.च्या मालाची पाहणी करता त्यामध्ये विदेशी दारु मॅक्डॉल नं .१ व्हिस्कीचे एकुण ९ बॉक्स त्यावर मॅक्डॉल नं .१ , व्हिस्की रिजर्व ओरिजनल प्रत्येकी एका बॉक्समध्ये १८० , एम.एल.च्या ४८ काचेच्या बाटल्या , एका बाटलीची किंमत १५० / – रु . एका उघडलेल्या बॉक्समध्ये ४० बाटल्या अशा एकुण ४२४ मॅक्डॉल नं .१ व्हिस्की १८० एमएलच्या खाकी कागदी बॉक्सध्ये असा एकुण ६३,६०० / – रु . प्रोव्हि.माल तसेच त्याची विक्री करुन जवळील रोख रुपये १५०० / – व टाटा मॅजिक टेम्पो त्याचा आर.टी.ओ. क्रमांक एम . एच .१२ – एन.यु. – ९. २४२पाढ – या रंगाचा ३००००० रुपये किंमतीचा असा एकुण ३,६५,१०० रुपयेचा मुद्देमाल जवळ बाळगलेला मिळुन आला .आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त परि -२ आनंद भोईटे , सहा . पोलीस आयुक्त, सजंय नाईक पाटील देहुरोड विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने , चिखली पो.ठाणे , पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे , व पो.हवा . सुनिल शिंदे , पो.ना . नरहरी नाणेकर , पो.ना. विपुल होले , पो.ना.चंद्रशेखर चोरघे , पो.शि. कबीर पिंजारी , पो.शि. संतोष सपकाळ , पो.शि.सचिन नलावडे यांनी केली आहे .