पिंपरीत भिमजयंती उत्साहात साजरी ;पावसाने हजेरी लावत महामानवाला दिली अनोखी मानवंदना
पिंपरी(वास्तव संघर्ष) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (14 एप्रिल) रोजी रात्री आठ वाजता कडक निर्बंध लावले आहेत . त्यामुळे आज पिंपरी चौकातील महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळपासूनच भिमअनुयायी महामानवाचे दर्शन घेण्यासाठी येथे येत होते. सर्व भिमअनुयायी आठच्या आत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी येत होते. कोरोना असल्याने दर्शनलाही पायबंद घालत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस फोर्स देखील पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आठ वाजता संचारबंदी लागू करण्यात येणार आहे गर्दी करु नये असे आवाहन देखील सकाळपासून वारंवार करण्यात येत होते.
मात्र, भिमअनुयायी अगदी शांतपणे आणि संयमाने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून बाबासाहेबांची जयंती उत्सवात साजरी करत होते . यामध्ये निर्सगाने देखील राञी सातच्या दरम्यान नतमस्तक होऊन या महामानवाला अमिवादन केल्याचे चित्र पाहण्यास दिसले .दिवसभर कडाक्याच्या उन्हात तापून निघालेले नागरिक पाऊस पडल्याने सुखावह होत होते. एकिकडे सरकारने दिलेले निर्बंध काही नागरिक पाळताना दिसत नाही तर दुसरीकडे घरीच रहा सुरक्षित रहा असाच संदेश या पावसाने दिला आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही राष्ट्र घडवण्यासाठी दिलेले योगदान अनन्य साधारण असून येणा-या अनेक पिढ्यांसाठी बाबासाहेबांचे विचार प्रेरक ठरतील असे प्रतिपादन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी यावेळी नागरिकांना शुभेच्छा देताना त्या बोलत होत्या.
महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस, पिंपरी चौक येथील पुर्णाकृती पुतळयास, एच.ए कॉलनी,पिंपरी येथील अर्धाकृती पुतळ्यास तसेच दापोडी प्राथमिक शाळेजवळील अर्धाकृती पुतळ्यास आज महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महापालिका मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त राजेश पाटील, उपआयुक्त आशादेवी दुरगुडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे,जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, कामगार नेते गणेश भोसले आदी उपस्थित होते.
पिंपरी चौक, येथे झालेल्या कार्यक्रमावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके ,विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, नगरसदस्या सुलक्षणा धर, मनसे गटनेते सचिन चिखले , आयुक्त राजेश पाटील, उपआयुक्त आशादेवी दुरगुडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, कामगार नेते गणेश भोसले, जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे आदी उपस्थित होते.
एच.ए कॉलनी येथे झालेल्या कार्यक्रमावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, माजी उपमहापौर महमदभाई पानसरे, नगरसदस्या सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, आयुक्त राजेश पाटील, उपआयुक्त आशादेवी दुरगुडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले , जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, कामगार नेते गणेश भोसले , जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे आदी उपस्थित होते.
दापोडी येथे झालेल्या कार्यक्रमावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, सुलक्षणा धर , अंबरनाथ कांबळे, राजू बनसोडे , आयुक्त राजेश पाटील, उपआयुक्त आशादेवी दुरगुडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले , जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, कामगार नेते गणेश भोसले, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आकाश चव्हाण आदी उपस्थित होते