बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

‘घरकुल’ नंतर प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्याची शेवटची संधी

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी चिखली येथे घरकुल प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती. यासाठी पालिकेने स्वहिस्सा भरण्यासाठी लाभार्थ्यांना शेवटची संधी दिल्यानंतर आता झोपडपट्टी निमुर्लन व पुनर्वसन विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करणेसाठी अंतिम मुदत दि. 30 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असुन कागदपत्रे मुदतीत सादर न केल्यास सदर लाभार्थ्यांचे नाव निवड यादीतुन रद्द करण्यात येईल. तरी या योजनेत निवड झालेल्या व अद्यापपर्यंत कागदपत्रे सादर न केलेल्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र सादर करावीत असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

सदर योजनेत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी रावेत येथे 934 , बोऱ्हाडेवाडी येथे 1288 , चऱ्होली येथे 1442 असे एकुण 3664 सदनिका वाटप करणेसाठी योजना राबविणेसाठी मान्यता देण्यात आली आहे.

निवड झालेल्या परंतु कागदपत्रे सादर करणे करीता उपस्थित न राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या नोटीस बोर्डवर लावणेत आली असुन महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर (www.pcmcindia.gov.in/marathi/pmay_iresult.php) देखील सदर यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.तरी, या योजनेत निवड झालेल्या व अद्याप पर्यंत कागदपत्रे सादर न केलेल्या लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत असे आवाहन करण्यात येत आहे

Share this: