आणि मेव्हण्यानेच घातला त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड

चिखली (वास्तव संघर्ष): आपल्या पत्नीला आणि मुलाला भेटायला गेलेल्या एकाला त्याच्या मेव्हण्याने शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.13) रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी दीडच्या दरम्यान पाटीलनगर चिखली येथे घडली आहे.

अमोल सुरेश कागे (वय 40,रा.ओंकार सोसायटी, जैन मंदिराजवळ, देहू- आळंदी रोड, चिखली पुणे) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मेव्हणा लक्ष्मण दुधभाते (रा. पाटीलनगर, चिखली ) मावस मेव्हणा विशाल बनसोडे, मेव्हणा राम दुधभाते (रा. जाधववाडी चिखली ) महिला आरोपी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मुलाला आणि पत्नीला भेटण्यासाठी आले असता तिचा भाऊ लक्ष्मण दुधभाते याने फिर्यादी यांना वाईटवाईट शिवीगाळी करुन फिर्यादीचे डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच आरोपी विशाल याने लाकडी दांडक्याने डोक्यात मारुन जखमी केले तसेच मोठा मेव्हणा आरोपी राम दुधभाते याने लाकडी काठीने डावे हातावर, पाठीवर, पायावर मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांची पत्नींने दगड विटांनी मारहाण केली. फिर्यादी यांचा मुलगा अनिकेत हा भांडणे साडविण्यासाठी पुढे आला असता त्यालाही हाताने मारहाण केली तसेच वरील सर्वांनी वाईटवाईट शिवीगाळी करुन हाताने मारहाण केली.याबाबत अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Share this: