नेहरूनगर येथील नव्या कोर्टाचे बुधवारी उद्घाटन
पिंपरी (वास्तव संघर्ष): मोरवाडी न्यायालयाचे नेहरूनगर येथील नव्या इमारतीमध्ये स्थलांतर केले जाणार आहे. हा स्थलांतराचा कार्यक्रम येत्या बुधवारी (दि.17) सकाळी साडे नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शाम चांडक व महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आर. एल. वानखेडे, न्यायाधीश एन. आर. गजभिये, न्यायाधीश आर. एम. गिरी, न्यायाधीश एम. जी मोरे. न्यायाधीश श्रीमती पी.सी. फटाले, न्यायाधीश एस.पी. कुलकर्णी व आमदार महेश लांडगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.नेहरुनगर येथील इमारतीत जिल्हा न्यायालय, जिल्हास्तरीय वरिष्ठ दिवाणी न्यायालय मोटार व्हेईकल, फॅमिली आणि तीन जेएमएफसी न्यायालयांना मंजुरी देण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ, उपाध्यक्ष अॅड. जयश्री कुटे, सचिव अॅड. गणेश शिंदे, सचिव अॅड. प्रमिला गाडे, सहसचिव अॅड. मंगेश नढे, खजिनदार अॅड. विश्वेश्वर काळजे, हिशोब तपासणीस अॅड. राजेश रणपिसे, सदस्य अॅड. स्वप्निल वाळुंज, अॅड. नितीन पवार, अॅड. अक्षय केदार, अॅड. पवन गायकवाड, अॅड. सौरभ जगताप, अॅड. प्रशांत बचुटे व वकील बंधू-भगिनी व नोटरी व्यावसायिक उपस्थित राहणार आहेत