उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचे होणार उद्घाटन
पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोमवार, दिनांक 15 मे 2023रोजी सकाळी 11.30 पासून राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास चंद्रकांत पाटील , मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण , वस्त्रोद्योग , संसदीय कार्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा हे प्रमुख अतिथी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
सकाळी 11.30 वाजता चिखली येथील 100 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून सकाळी 11.45 वाजता चिंचवड येथील सायन्स पार्क शेजारील तारांगण प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन सकाळी 11.55 वाजता ऑटोक्लस्टर शेजारील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर होणार असून आकुर्डी येथील पी. एम. आर. डी. ए. कार्यालया शेजारील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उद्घाटन 12.10 वाजता होणार आहे.
या शिवाय निघोजे एमआयडीसी तळवडे येथील इंद्रायणी नदीवरील पंप हाऊस आणि इतर प्रकल्प, बोऱ्हाडेवाडी येथील शाळा इमारत, पुणे नाशिक महामार्ग मोशी येथील सब फायर स्टेशन, रावेत येथील सेक्टर 32अ, येथील उद्यान, मध्यवर्ती निर्जंतुकीकरण केंद्र,ब क्षेत्रीय कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत,लॉन टेनिस कोर्ट सुविधा, स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल, कृष्णानगर येथे 3 फूल साईज कोटर्स, वीर सावरकर उद्यान, से. क्र. 26, प्राधिकरण येथे ३ मिनी व २ फुल साईज कोटर्स, नेहरूनगर प्रभाग क्र. 9 येथील नवीन शाळा इमारत बांधणे, इंद्रायणीनगर येथील उद्यान व विरंगुळा केंद्र, घरकुल चिखली येथील भाजी मंडई, सेक्टर 21 येथील लाईट हाउस प्रकल्पाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
वाकी तर्फे वाडा तालुका खेड भामा आसखेड प्रकल्पातील जॅकवेलच्या कामाचे भूमिपूजन, पिंपरी येथील डेअरी फार्म पुलाचे भूमिपूजन, मोशी, डुडुळगाव येथील जागेवर प्राथमिक शाळा इमारत बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन, चोवीसावाडी च-होली येथील प्रभाग क्र.3 येथे नवीन अग्निशामक केंद्र उभारणीच्या कामाचे भूमिपूजन,गवळीनगर आणि कासारवाडी येथील घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन, पॅकेज 3 अंतर्गत धावडेवस्ती येथील पाण्याची उंच टाकी बांधण्याच्या कामांचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
महापालिका हद्दीतील सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण करणे व मालमत्तांचे सुधारित कर आकारणी करणे, मालमत्ता कर विभागाच्या सर्व सेवा वार्षिक पातळीवर पुरविणे याकामाचा तसेच दिव्यांग नागरिकांना निरामय आरोग्य विमा योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, डॉ अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, संग्राम थोपटे, दिलीप मोहिते पाटील, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप उपस्थित राहणार असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली.