महापौर राहुल जाधव पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सांगलीला :महापालिकेतील विशेष पथकही सोबतीला
पिंपरी(वास्तव संघर्ष) :-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी विशेष पथक पाठवण्यात आले.काल महानगरपालिक च्या वतीने 3 जेटींग कम सक्षन मशीन व 10 कामगार पाठवण्यात आले होते.
आज पिपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने प्रशासकीय इमारती पासून पाठविण्यात आलेल्या विशेष टीम च्या वेळी महापौर राहूल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रविण लडकत, प्रशांत पाटील, दत्तात्रय रामगुडे, ओमप्रकाश बहिवाल व पूर बाधित नागरिकांना मदत करण्यासाठी निघालेले प्रशिक्षित मदतनीस आदी उपस्थित होते.
या टीम सोबत 60 मदतनीस कर्मचार्यांसह 6 मलजेट मशीन 1, वॉटर टॅन्कर, 1 फायर ब्रिगेडची गाडी तसेच जेवण व औषधांसह अत्यावश्यक साहित्य पाठवण्यात आले आहे.
विशेष टीम बरोबर महापौर राहुल जाधव असणार आहेत.