रस्त्याने जात असलेल्या टेम्पोला अडवले;टेम्पो उघडताच पोलिसांनाही बसला धक्का
चाकण (वास्तव संघर्ष) : पिंपरी -चिंचवड गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने आंबेठाण रोडवरील महिंद्रा सीआयई कंपनीजवळ रस्त्याने जात असलेल्या टेम्पोला पोलीसांनी त्या टेम्पोमध्ये तब्बल साडेतीन लाखांचा अवैध गुटखा जात असताना पोलिसांनी तो पकडला. ही कारवाई बुधवारी ( दि. 8) दुपारी करण्यात आली आहे.
रामचंद्र कुमाराम चौधरी ( वय 28, रा. पडवळ वस्ती तिरुमला पार्क आंबेठाण रोड चाकण ), हनुमान चौधरी , सुनील गंगणे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आंबेठाण चाकण तिरुमला पार्क येथे एका खोलीत आरोपी हनुमान चौधरी याने गुटख्याची साठवणूक केली. तो चारचाकी टेम्पोतून हा गुटखा आजूबाजूच्या परिसरात विकतो अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी 3लाख 50 हजार 520 रुपयांचा गुटखा , 1हजार 800 रुपये रोख रक्कम आणि 1लाख रुपये किमतीची एक टेम्पो असा एकूण चार लाख 52 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे , पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे ) डॉ काकासाहेब डोळे, सहा. पोलीस आयुक्त डॉ. अमृतकर, पोनि देवेंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोउपनि धैर्यशिल सोळंके पोलीस अंमलदार संतोष बर्गे , किशोर पढेर अनिल महाजन , गणेश कारोटे , सोनाली माने यांनी केली आहे .