पिंपरी चिंचवडमधील नायब तहसीलदार ७००० ची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळयात
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड मधील अप्पर हवेली तहसीलदार निवासी तहसीलदार ऐपतदार दाखला देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. विकी मदनशिंग परदेशी (वय – ३७ राहणार विंडवर्ड सोसायटी वाकड) असे त्यांचे नाव आहे.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले की,तक्रारदार यांनी ऐपतदार दाखल्यासाठी पिंपरी-चिंचवड येथीलतहसिलदार कार्यालयात अर्ज केला होता माञ ऐपतदार दाखला देण्यासाठी ७ हजार रुपयांची मागणी केली होती. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आल्यावर त्यांनी पडताळून ही कारवाई केली आहे. त्यात परदेशी यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर बुधवारी सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी विनोद भोकरे, नंदलाल गायकवाड, मुश्ताक खान, प्रशांत बो-हाडे, अविनाश इंगुळकर यांनी सापळा रचून तहसीलदाराला रंगेहाथ अटक करण्यात आली.