अॅसिडीटीच्या त्रासामुळे मुख्यमंञ्याची प्रकृती बिघडली,प्रकृती स्थिर असून आराम करण्याचा सल्ला.
औरंगाबाद (वास्तव संघर्ष) : हायपर अॅसिडीटीच्या त्रासामुळे प्रकृती बिघडल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल वाशीमचा दौरा अर्धवट सोडून औरंगाबादला यावे लागले होते. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असून काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे.
काल वाशीम दौ-यावर असताना मुख्यमंत्र्यांना अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यामुळे ते बुलडाण्याचा कार्यक्रम आटोपून थेट औरंगाबादला आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि आरामाचा सल्ला दिला आहे.
माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सततचे काम, अपुरी झोप यामुळे असा त्रास होऊ शकतो असे सांगून डॉक्टरांनी त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. दोन तास विश्रांती घेतल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईला रवाना झाले. त्यांच्या सोबत पर्यटनमंत्री जयकुमार रावळ हेही होते.
बुलडाणा येथील राजमाता जिजाऊच जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजाच्या विकास आराखड्याचे ३११ कोटीच्या निधीमधील प्रथम टप्प्याचा निधी पंचवीस कोटी मंजूर झाला आहे. त्यातील १२ कोटी ९६ लाख रुपयाच्या कामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांनी पुढील कार्यक्रम रद्द केले