बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन जागा मालकास मिळणार 100 कोटींचा मोबदला

पिंपरी (वास्तव संघर्ष) :- पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन केले जाणार असून त्यासाठी जागा मालकास जागा ताब्यात घेण्यासाठी मोबदला देण्यात येणार आहे . त्यासाठी अंदाजे 100 कोटी खर्च अपेक्षित आहे .

खासगी मालकीच्या आणि महापालिका मालकीच्या जागेवर गांधीनगर वसले आहे . 62 हजार 714 चौरस मीटर क्षेत्रफळावर वसलेल्या या झोपडपट्टीच्या जागेवर खेळाचे मैदान , दवाखाना , माध्यमिक शाळा , किरकोळ बाजार , उद्यान , डिपी रस्ता आदींचे आरक्षण आहे . पंतप्रधान आवास योजनेंतर्गत या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला जाणार असल्याने भूखंड ताब्यात घेण्याकामी जागा मालकास 100 कोटी रुपये मोबदला द्यावा लागणार असल्याचे सल्लागाराने म्हटले आहे .

याखेरिज 26 लाख 15 हजार 750 चौरस फुट ‘ स्लम टीडीआर ‘ होणार असून त्याची किंमत करोडोंमध्ये आहे .

दरम्यान, गांधीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना या पुनवर्सन संदर्भात अद्याप कुठलीही माहीती नसून ते संभ्रमित आहेत. तसेच नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share this: