सन्मान माणुसकीचा कार्यक्रम ; शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त् राष्ट्रवादी युवतीच्या वतीने तृतीयपंथी यांचा सन्मान
पिंपरी (वास्तव संघर्ष) : आजच्या आधुनिक आणि प्रगतिशील काळातही पूर्वग्रहदूषित गैरसमजांना सामना करत असलेले तृतीयपंथी लोक. ते सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जात आहेत. त्यांना समाजात माणूस म्हणून नवीन ओळख मिळावी. यासाठी दूरदृष्टी ठेवत आदरणीय शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे तसेच उपमुख्यमंत्री . अजितदादा पवार यांनी LGBTQI+ या सेलची स्थापना केली असून… त्या सेलच्या माध्यमातून त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार आहे.
शरदचंद्र पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष – जयंत पाटील ,सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात व मा. सक्षनाताई सलगर यांच्या मार्गदर्शनखाली “सन्मान माणुसकीचा”हा उपक्रम आज भी संपन्न करण्यात आला आहे. यावेळी तृत्तीयपंथीना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.यामध्ये अमित बाबा, कीरण म्हस्के, करीश्मा म्हस्के, स्वरा जाधव, चिंगी जाधव, किरण वाघ-म्हस्के, समीरा खान, निकिता मख्यदल, मधुताई जगताप, मारीया म्हस्के, पुष्पा म्हस्के यांचा सन्मान करण्यात आला आहे
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, फझल शेख, विजय लोखंडे, सुलक्षणाताई शिलवंत, गंगाताई धेंडे, नेहा पडवळ, अपर्णाताई मिसाळ, विद्यार्थी अध्यक्ष यश दत्ता ( काका) साने, मनिषाताई गटकळ, आशा शिंदे, अमोल भोईटे, अकबर मुल्ला, बाळासाहेब पिल्लेवार,गोरोबा गुजर, विजया काटे, सुप्रिया काटे, हिना अत्तार, झहिर खान, नयन, मेघना, रूपाली माईमकर, सारिखा ढमे,अश्विनी पवळ, फातिमा अन्सारी,अभिषेक अल्हाट, ज्योती शिंदे, विनय शिंदे, माधव पाटील, पल्लवी पांढरे, साहुल उर्फ हमीद शेख,बाळासाहेब जगताप, महेश झपके, निर्मला माने इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.