वेश्याव्यवसायाठी वापरण्यात आलेले हाॅटेल ग्रॅन्ड मन्नत सिलबंद ;हिंजवडी पोलीसांची दमदार कामगिरी
पिंपरी (वास्तव संघर्ष) : हिंजवडीतील ग्रॅन्ड मन्नत या प्रसिद्ध हॉटेलमध्ये वैश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीसांनी या ठिकाणी छापा टाकून चार पिडीत तरुणीची सुटका केली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार झाले आहेत.
गणेश कैलास पवार (वय- २० , सद्या रा – हॉटेल ग्रॅन्ड मन्नत , येळवंडे वस्ती , हिंजवडी,) या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपी समीर ऊर्फ राज ऊर्फ तय्यब सय्यद ,युसुफ सरदार शेख ,हिरा पुर्ण नाव पत्ते माहीत नाही.हे आरोपी फरार झाले आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील अटक आरोपी गणेश कैलास पवार व त्याचे फरार तीन आरोपी यांनी आपसात संगनमत करुन आपले स्वताच्या फायद्याकरिता यातील पिडीत मुलींना पैशांचे अमिष दाखवुन हिंजवडीतील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत येथे वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करुन वेश्याव्यवसाय करवून घेवुन त्यातुन मिळणारी कमाई स्वतःच्या उपजीविकेकरीता वापरताना मिळुन आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच वैश्याव्यवसाय करणेसाठी वापरण्यात आलेले हॉटेल ग्रॅन्ड मन्नत सहा महिन्यांसाठी सिलबंद करण्यात आले आहे.
तसेच यापुढे देखील हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हददीत मिळुन येणारे अवैध धंदे समुळ नष्ट करण्यासाठी अशीच कारवाई करणार असल्याने हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी “ हिंजवडी पोलीस स्टेशनच्या परिसरात गावठी दारू , अवैध गुटखा वेश्या व्यवसाय मटका क्लब अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याचे निर्दशनास आले तर माहीती दयावी असे आवाहन हिजवडा पालीस स्टेशनमार्फतीने केलेले आहे . सदर गुन्हयातील आरोपी याचा पुर्वहतिहास तपासुन त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करणार असल्याची माहीती हिंजवडी पोलीसांनी दिलेली आहे .