महापालिकेची फसवणूक केलेल्या ठेकेदाराविरुद्ध मनसे आक्रमक ;सचिन चिखले करणार शहरभर व्यापक आंदोलन
पिंपरी (वास्तव संघर्ष ) शहरातील सामान्य नागरिकांच्या कष्टातून आणि कर स्वरूपात मिळणा-या त्यांच्या पैशातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका उभी राहिली आहे आणि याच महानगरपालिकेची फसवणूक ठेकेदार करत आहेत ठेकेदाराविरुद्ध शहरातील मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांचदिले आहे .शिवाय सदरील निवेदनामध्ये खालील बाबींचा सामावेश करत आरोपी ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे..
सचिन चिखले यांनी या निवेदनात म्हटले आहे की, दिं 1 डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेतील विविध विकास कामांसाठी ठेकेदारांनी परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट भरताना ठेकेदारांनी खोटे बँक ठेव भरून महापालिका तसेच बँक यांची फसवणूक केल्याचे लक्षात आलेले आहे तरी या गुन्ह्यासाठी 420 अंतर्गत नुसार किमान सात वर्षाचा कारावास अशा प्रकारच्या शिक्षेची नोंद आहे.तरी यावर अंमलबजावणी होताना दिसत नाही महाराष्ट्रातील अग्रगण्य आशा महापालिकेत अशा प्रकारची फसवणूक ठेकेदार करत असतील तर अशा लोकांवरती कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे तरी या ठेकेदारावर ती खटला भरून कारवाई करावी.
जर कारवाई करत असताना स्थानिक सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष या लोकांना पाठीशी घालत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी-चिंचवड शहर यांच्यावतीने शहरभर व्यापक आंदोलन छेडण्यात येईल,तसेच माननीय उच्च न्यायालयात याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने जनहितार्थ याचिका दाखल करून कारवाई करण्यास भाग पाडण्यात येईल असा इशारा देखील चिखले यांनी दिला आहे.