संतापजनक:नेहरूनगरमधील जम्बो कोविड सेंटरमध्ये मृत कोरोना रूग्णांच्या अंगावरील दागिने चोरीला
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरीतील नेहरूनगर जम्बो कोविड सेंटरमधील मृत कोरोना रूग्णांच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल चोरून नेल्याचे दोन प्रकार उघडकीस आले आहे. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात (दि.05) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अज्ञात चोरटय़ा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर दिवाकर गुजर (वय ३५ वर्षे धंदा नोकरी रा . सर्वे नं .१४७ / १ / २ / २३ कॉलणी नं .२ , बोपखेल) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी सागर गुजर यांची आई कै.सितल दिवाकर गुजर (वय ६१ वर्षे. रा . बोपखेल) यांना दि . १४/०४/२०२१ रोजी कोवीड पॉझिटीव्ह असल्याने जम्बो कोवीड सेंटर नेहरुनगर पिंपरी पुणे येथे अॅडमिट केले असता त्यांचे दि .१ ९ / ०४ / २०२१ रोजी निधन झाल्याने त्यांचे सोबत त्यांचे अंगावर असलेले मंगळसुत्र , कानात फुल , एक सोन्याची अंगठी व दोन चांदीच्या अंगठ्या असा एकुण ४१००० किंमतीचा माल हा कोणीतरी अज्ञात चारटयाने चोरुन नेला आहे .अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
तर दुस-या घटनेत…
वैष्णवी ज्योतीबा खुळे( वय २० वर्षे, रा . जिजावु निवास , विठ्ठल मंदीराचे जवळ , पिंपळे निलख) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अज्ञात चोरटय़ा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, पिंपरीतील नेहरूनगर जम्बो कोविड सेंटरमधील फिर्यादी वैष्णवी खुळे यांचे मामा कै.प्रशांत विश्वनाथ मोरे (वय ४० वर्षे रा . तनिष्क भक्ती मरकळ रोड आळंदी) यांना दि . २५/०४/२०२१ रोजी कोवीड पॉझिटीव्ह असल्याने जम्बो कोवीड सेंटर नेहरुनगर पिंपरी येथे अॅडमिट केले असता त्यांचे दि . ०१/०५/२०२१ रोजी निधन झाल्याने त्यांचे सोबत असलेला त्यांचा १०००० किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी करुन चोरुन नेला आहे .या दोन्ही घटनेबद्दल नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.