धक्कादायक: प्रेयसीचे नग्न व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल करण्याची धमकी
भोसरी (वास्तव संघर्ष): प्रेयसीचे अश्लील व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.12) जानेवारी रोजी दापोडी येथे घडली आहे.
याप्रकरणी पीडिती महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महेश भीमराव कांबळे (रा.दापोडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत फिर्यादी महिलेचे आरोपी महेश याच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने पिडीत फिर्यादीच्या नकळत तिचे नग्न अवस्थेत व्हिडिओ तयार केले तसेच ते पिडीत फिर्यादीस पाठवून फेसबुक या सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.