क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

फेसबुकवर कमेंट करणं भोवलं ;कासरवाडीतील तरुणावर गुन्हा दाखल

पिंपरी(वास्तव संघर्ष)फेसबुक या सोशलमिडीयावर कमेंट करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कासारवाडीतील एका तरुणावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

संजय शेडगे (रा. कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिस नाईक विनायक दगडू वर्पे यांनी गुरूवारी (दि. २) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ एप्रिल रोजी जयवंत जाधव यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर “निजामुद्दीन का मरकज संक्रमण का सबसे बड़ा सेंटर?” अशी बातमी शेअर केली होती. या बातमीच्या खाली आरोपी संजय शेडगे यांने धार्मिक भावना दुखावतील अशी कमेंट केली होती. या कमेंटमुळे बादशहा लाला शेख यांनी आपल्या व मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याची पोलिसांकडे तक्रार केली. यामुळे पोलिसांनी शेडगे याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Share this: