मुलाला पोलिसांनी पकडले म्हणून बापाने धक्काबुक्की करत पोलीस ठाण्यात घातला राडा
चिंचवड (वास्तव संघर्ष) : अवैध कोयत्यासह मुलाला पोलिसांनी पकडले म्हणून बापाने धक्काबुक्की करत पोलीस ठाण्यात राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (दि. 26) रोजी चिंचवड पोलीस ठाण्यातील तपास पथक रुममध्ये घडली.
चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई अमोल माने , यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लुकमान इस्माईल शेख ( वयः-56, राः- बि.नं.5 नं .603 , मोरया हॉसींग सो . वेताळनगर चिंचवड) या आरोपीला चिंचवड पोलीसांनी अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लुकमान शेख याचा मुलगा समीर लुकमान शेख याला फिर्यादी पोलीस शिपाई अमोल माने हे तपास पथक येथे कर्तव्यास असताना अवैध कोयत्यासह पकडले होते. त्यामुळे त्याला चिंचवड पोलीस स्टेशनकडील तपास पथक रुममधे तपास करण्यासाठी आणले होते. तपास करत असताना आरोपी लुकमान शेख हा मोठ मोठयाने आरडाओरडा करुन तपास पथक ऑफिसमध्ये घुसुन फिर्यादी पोलीस शिपाई अमोल माने हे सरकारी कामकाज करत असताना त्यांच्या सहकारी पोलीसांना धक्का बुक्की देवुन हाताने मारहाण करत पोलीस ठाण्यातच राडा घातला. व सरकारी कामात अडथळा निर्माण केला. आरोपी लुकमान शेख याला पोलिसांनी अटक केली असून चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुदळे अधिक तपास करीत आहेत.