क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात चोरांचा धुमाकूळ ;राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची दुचाकी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून नेली चोरून

पिंपरी (वास्तव संघर्ष) : नगरसेवकाची दुचाकी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून चोरून नेण्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे. हा प्रकार 4 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू बनसोडे यांच्या दापोडी येथील जनसंपर्क कार्यालयासमोर उघडकीस आली.

नगरसेवक राजू विश्वनाथ बनसोडे (वय 40, रा. सीएमई गेट समोर, जाधव चाळ, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवक बनसोडे यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एमएच 14 ईजे 9366) पुणे-मुंबई महामार्गावर सीएमई गेटसमोर असलेल्या जनसंपर्क कार्यालयासमोर 3 सप्टेंबर रोजी द्पारी साडेतीन वाजता पार्क केली.

अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक उघडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 4 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आला. याबाबत 9 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this: