मास्क न वापरणा-या 27 हजार 989 पुणेकरांवर पोलिसांची कडक कारवाई
पुणे (वास्तव संघर्ष) :पुणे शहरात कोरोना प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क परिधान न करता बाहेर फिरणाऱ्या 27 हजार 989जणांवर पुणे पोलिसांनी कडक कारवाई कारवाई केली आहे. त्यानुसार 2 ते 10 सप्टेंबर या कालावधीत 27 हजार 989 पुणेकरांवर कारवाई करून तब्बल 1 कोटी 39 लाख 94 हजार 500 रूपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुणे शहर कोरोनाच्या विळख्यात दिवसेंदिवस अडकत चालले आहे . आणि त्यातच पुणेकरांची गंभीरता दिसून येत नाही, त्यामुळे कोरोना रुग्णाचा आकडा वाढत आहे. हा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार एक हजार व पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे.
कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर शहरातील प्रत्येक चौकामध्ये पोलीस कारवाई करीत आहेत. शहरात 2 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान 27 हजार 989 पुणेकरांवर मास्क न वापरल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. यामध्ये 1 कोटी 39 लाख 94 हजार 500 रूपयाचा दंड वसूल करण्यात आला