रिक्षा चालकाचा मोबाईल चोरटय़ांनी जबरदस्तीने चोरून नेला
पिंपरी (वास्तव संघर्ष):तू मला रिक्षा पाठीमागे का मारली असे म्हणून एका रिक्षाला चालकाला थांबवून मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना रविवारी ( दि. 5 ) रात्री पावणे बारा वाजता संतोषी माता चौक नेहरूनगर येथे घडली घडली.
संतोष तुळशीदास शिंगे ( वय 40, रा. खराळवाडी पिंपरी ) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत . ते रविवारी रात्री पावणे बारा वाजता नेहरूनगर मधील संतोषी माता चौकातून रिक्षा घेऊन जात होते. त्यांच्या पाठीमागून एक व्यक्ती दुचाकीवरून आला. त्याने शिंगे यांना रिक्षा थांबवण्यास सांगितले. ‘ तू मला पाठीमागे रिक्षा का आडवी मारली ‘ असे म्हणून शिंगे भांडण करून रिक्षात समोर ठेवलेला चार हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.