ॲम्बुलन्स ड्रायव्हरच्या डोक्यात पत्नीनेच फोडली बियरची बॉटल
भोसरी (वास्तव संघर्ष) :पती कामावरुन घरी जात असताना पत्नीने आपल्या साथीदारांच्या मदतीने पतीच्या डोक्यात बियरची बॉटल फोडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना शनिवारी (दि.25) रोजी रात्री दहाच्या सुमारास क्वॉलीटी पॅटर्न वर्कस् कंपनीच्या गेटसमोर महात्मा फुलेनगर येथे घडली.
उमाकात विलास तपसाळे (वय-41, धंदा- ॲम्बुलन्स ड्रायव्हर रा. टिंगरे पेट्रोलपंपासमोर , बबन पार्क , आंळदी रोड , भोसरी
महिला आरोपी, अभिराम गायकवाड (वय-50 रा.बावडा चौक , इंदापुर रोड पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ॲम्बुलन्स ड्रायव्हर म्हणून डी वाय पाटील दवाखान्यात काम करत आहे. शनिवारी कामावरुन घरी जात असताना फिर्यादी यांची पत्नी हि फिर्यादी सोबत गेल्या एक महिन्यापासुन एकत्र राहत नाही त्यांच्यातील घरगुती भांडणातुन आरोपी पत्नी आणि अभिराम यांनी संगणमत करुन फिर्यादीच्या डोक्यात बियरची बॉटल मारुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांना खाली पाडुन शिवीगाळ करुन लाथा बुक्क्याने मारहाण करत अंगावर डिसेल ओतून पेटवून जिवे ठार मारतो असे म्हणुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोउपनि साकोरे करित आहेत.