क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पोलीसांला‘तुमच्या नोक-या घालवतो’ अशी त्याने दिली धमकी… नंतर काय झाले?

 

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :-  रविवारी रात्री पोलीस शिपाई डांगे चौकात वाहतूक नियमन करत होते. डांगे चौकातून पुनावळेकडे जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. रात्री सव्वादहाच्या सुमारास जगदाळे त्या मार्गावरुन त्याची कार (एमएच १४ डी एक्स ०७५९) घेऊन जात होता. पोलीस शिपाई भोर यांनी त्याला थांबण्याचा ईशारा केला. त्याचा जगदाळे याला राग आल्याने त्याने भोर यांना शिवीगाळ केली.

तसेच ‘तुमच्या नोक-या घालवतो’ अशी धमकी दिली. जगदाळेच्या कारमध्ये बसलेला माने भोर यांच्या अंगावर धावून गेला. वाकड येथे रविवारी (दि. ३०) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

राहुल शशिकांत जगदाळे (वय ३९, रा. थेरगाव), राहुल अर्जुन माने (वय २९, रा. बिजलीनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई महेश शंकर भोर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.याबाबत दोघांना अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत

Share this: