बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते नवीन घरोघरचा कचरा वेचणा-या गाड्यांचे उद्घाटन

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :-  पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे काम नवीन कंत्राटदाराने आज सोमवार (दि. १ जुलै) पासून सुरु केले आहे. नवीन गाड्यांसह कचरा संकलन आणि वहनाच्या कामास सुरुवात केली आहे. नागरिकांनी ओला, सुका आणि घातक कचरा वेगळा करुन देण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्या हस्ते गाड्यांचे पूजन करुन कचरा संकलनाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

शहरातील प्रत्येक प्रभागातही नगरसेवकांच्या हस्ते या नवीन गाड्यांचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. तसेच ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून तो टाकण्यासाठी प्रभागातील परिसरात नवीन घंटागाडी येणार असल्याचे नागरिकांना सांगितले

Share this: