भाजप कार्यालयातील चहा पण मी घेतला नाही; कार्यालयात गेलो यात गैर काय -आयुक्त श्रावण हर्डीकर
पिंपरी (वास्तव संघर्ष ) :-पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात आले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी मी भाजप कार्यालयात गेलो होतो. तेथे ५ ते १० मिनिटे थांबलो, त्यात गैर काय? असा सवाल पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व प्रशासकीय प्रोटोकॉल मोडीत काढल्याने आणि प्रशासकीय शिष्टाचार बाजूला ठेवून राजकीय पक्ष कार्यालयात उपस्थिती नोंदवल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टिका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्याच्या नामफलकावर प्रवक्ते भाजप असे स्टिकर चिटकवून निषेध केला. काँग्रेस, भारीप आणि इतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली
गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयुक्तांनी याचे स्पष्टीकरण याबाबत आयुक्त म्हणाले की, पालकमंत्री पाटील हे प्रथमच पिपरी चिचवड शहरात आले होते. त्याचे शहरात इतरत्र कोठेही कार्यक्रम नव्हते. म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी तेथे मी गेलो. मी भाजप कार्यालयात गेलो होतो. तेथे ५ ते १० मिनिटे थांबलो, कार्यालयात कमळाचे चित्र असलेल्या कपातील चहा मी घेतला नाही,असे आयुक्त म्हणाले