आयुक्तांच्या माध्यमातून लोकहिताची कामे होण्याऐवजी भाजप हिताची कामे, हर्डीकरांवर शिस्तभंगाची कार्यवाहीची भारिपची मागणी
पिंपरी(वास्तव संघर्ष) मावळचे आमदार बाळा भेगडे यांची नुकतीच महाराष्टाच्या राज्यमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यासाठी भाजप पक्ष कार्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या पक्षीय कार्यक्रमाला भाजप पक्ष कार्यालयात उपस्थिती नोंदवत महापालिका आयुक्तांनी बंद दाराआड पालकमंत्री व भाजपच्या काही नेत्यांसह हितगुज करून प्रशासकीय सेवेतील वर्तणुकीचे सर्व संकेत व शिस्तीचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर तातडीने शिस्तभंगाची कार्यवाही भारिप बहुजन महासंघ वतीने करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या प्रशासकीय धोरणामुळे व त्यावरील निर्णयामुळे यामध्ये रुग्णालय खाजगीकरण, रस्त्यावरील कचरा उचलण्याचे कंत्राट व इतर ठरवामुळे आयुक्त हे शहरातील भाजप पक्षाचे प्रवक्ते, दलाल आहेत अशी टीका नागरिकांच्या वतीने सातत्याने होत आहे..
आयुक्तांच्या माध्यमातून लोकहिताची कामे होण्याऐवजी भाजप हिताची कामे होत असल्याची परिस्थिती शहरामध्ये आहे. यात आता आयुक्तांची भाजप पक्ष कार्यालयातील कार्यक्रमाला लावलेली हजेरी हि त्याच बाबींची उघडउघड साक्ष असून आपण तातडीने या विषयावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी एका खाजगी हॉटेलमध्ये मनपाच्या अंदाजपत्रकाबाबत माहिती देण्यासाठी नगरसदस्यांची बेठक घेतली असता, त्यांच्या विरुद्ध तत्कालीन विरोधी पक्षाने तक्रार केली होती. या तक्रारीवर मा. मुख्यमंत्री आपणच त्यांची तातडीने बदली केली होती. हाच न्याय आपण विद्यमान आयुक्तांना सुद्धा ग्राह्य धरून आपल्या निपक्षपाती प्रशासनाचा दाखला द्यावा, व मा. आयुक्तांनी तात्काळ पिंपरी चिंचवड मधील जनतेसमोर त्यांच्या या वर्तनाचा खुलासा करावा असे आशयाचे निवेदन भारिप बहुजन महासंघाच्या वतीने करण्यात आले