क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

नेहरूनगर जम्बो कोविड सेंटरमध्ये संगणक गेला चोरीला;पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरीतील नेहरूनगर जम्बो कोविड सेंटर कोरोना बाधित रुग्णांने कमी पण चोरामुळे जास्त प्रकाशझोतात आले आहे. कोविड सेंटरमधील कोरोना रुग्ण आणि कोरोना मृतांचे मोबाईल दागिन्यांची चोरी होण्याचे प्रकार सर्रास घडत असताना आता चोरट्यांनी चक्क कम्प्युटर चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .

ही घटना 25 मे 2021 रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास घडली . याबाबत शनिवारी ( दि . 5 जून )रोजी अज्ञात चोरटय़ा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

प्रीती जोसेफ व्हिक्टर ( वय 50 , रा . कोंढवा , पुणे ) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी या पिंपरीतील नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरच्या व्यवस्थापक आहेत.अज्ञात चोरट्याने सेंटरमधील 33 हजार 101 रुपये किमतीचा सीपीयू , सात हजार 457 रुपयांचा एक मॉनिटर , एक हजार 186 रुपये किमतीचा किबोर्ड , असा एकूण 47 हजार 845 रुपये किमतीचा माल चोरून नेला . अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: