क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

टेल्को – भोसरी रोडवर डोक्यात गट्टूने मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरीतील नेहरूनगर गुलाबपुष्प उद्यानासमोर गवळीनगर , टेल्को – भोसरी रोडवर पत्ते खेळत बसलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूने मारून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे . ही घटना रविवारी ( दि .21 ) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली आहे.

अच्युत मधुकर राऊत ( वय 50 , रा . गुलाबपुष्प उद्यानासमोर गवळीनगर , टेल्को – भोसरी रोड ) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मुस्ताक सय्यद ( वय 55 , रा . गुलाबपुष्प उद्यानासमोर गवळीनगर , लो – भोसरी रोड ) याला पोलिसांनी अटक केली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अच्युत राऊत हे त्यांचे मित्र दिलीप लक्ष्मण खवळे, संजय भोसले, विठ्ठल करडे असे फुटपाथ लगत साई इलेक्ट्रीक दुकाना समोर मेंढीकोट ( पत्ते ) खेळत बसले असताना यातील आरोपी मुस्ताक सय्यद याने सदर या ठिकाणी येवुन खूनशी भावना ठेवून दोन वेळा भोवती फिरत असताना आज साल्याला खतमच करतो असे म्हणून फिर्यादीकडे रागाने पहात फिर्यादी बसले ठिकाणा पाठीमागे येवून हातात तेथील पडलेला सिमेंटचा गट्टू फिर्यादीच्या डोक्यात जोरात फेकून मारून शिवीगाळ करून आज सोडतच नाही खतमच करतो अशी धमकी देवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे अधिक तपास एमआयडीसी भोसरी करीत आहेत.

Share this: