क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

महिन्याला 25 हजारांचा हप्ता द्या; असे म्हणत कंपनी मालकावर केला खुनी हल्ला

चाकण(वास्तव संघर्ष) : गाडी कंपनीत लावा नाहीतर दरमहिन्याला 25 हजारांचा हप्ता द्या , अशी मागणी करत चौघांनी मिळून एकावर तलवारीने खुनी हल्ला केला . ही घटना शुक्रवारी ( दि . 19 ) रात्री म्हाळुगे इंगळे येथील अल्ट्राटेक सस्पेंशन प्रा ली या कंपनीच्या गेटवर घडली .

लोकेश रवींद्र पाटील ( वय 22 , रा . म्हाळुगे ) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

मंगेश गणपत आंबोले ( वय 33 , रा.सुदुंबरे , ता . मावळ ) या आरोपीसह अन्य तीन जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी म्हाळुगे इंगळे येथील अल्ट्राटेक सस्पेंशन प्रा ली या कंपनीत काम करत असताना रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास आरोपी मंगेश आंबोले याने हातात तलवार घेवून तु मला ओळखत नाही तु कोण मला विचारणारा थांब तुला जिवंत सोडत नाही तुला मारून टाकतो , “ माझी गाडी कंपनीत कामास लावा नाहीतर मी कोणाला सोडणार नाही माझी गाडी कामाला नाही लावली तर मला दर महिना २५ हजार रूपये हप्ता द्या ” असे म्हणून फिर्यादीस तसेच कंपनीचे अधिका – यांचे नावे शिवीगाळ दमदाटी करून त्याच्या हातात असलेली तलवार फिर्यादीस जिवे ठार मारणेचे उद्देशाने अंगावर चालविली . त्यात कंपनीचे सिक्युरीटी केबीनची काच फुटली . तसेच त्याचे इतर तिन साथीदार यांनी देखील शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Share this: