क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

नेहरूनगर येथील संतोषीमाता चौकात कोयता घेऊन फिरणाऱ्या आरोपींवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) :नेहरूनगर येथील संतोषीमाता चौक येथे लोखंडी कोयता आणि काठी घेऊन कोणाला तरी मारण्याच्या उद्देशाने विना परवाना बेकायदेशीर रित्या फिरणा-या दोन आरोपींविरुद्ध पिंपरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गणेश महादेव खाडे पोलीस शिपाई पिंपरी पोलीस स्टेशन यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मनोज ऊर्फ मन्या म्हसुकांत विटकर( वय ३ ९ वर्षे रा . साईबाबा मंदीर चाळ , नेहरुनगर पिंपरी पुणे . सध्या रा . दत्तनगर गणपती मंदीरामागे कात्रज पुणे) गब – या ऊर्फ हर्षल असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पिंपरी नेहरूनगर येथील संतोषीमाता चौक येथे यातील आरोपी मनोज ऊर्फ मन्या विटकर हा हातामध्ये एक लोखंडी कोयता व आरोपी गब – या ऊर्फ हर्षल हा हातामध्ये एक काठी कोणाला तरी मारण्याचे उद्देशाने विना परवाना बेकायदेशीर रित्या जवळ बाळगून असताना मिळून आले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: