आकुर्डीतील बांधकाम साईटवर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू ; ठेकेदारासह बिल्डरवर गुन्हा दाखल
निगडी (वास्तव संघर्ष) :आकुर्डीतील बांधकाम साईटवर जखमी झालेल्या कामगाराचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कामगारांच्या मुत्यूप्रकरणी बिल्डर ठेकेदारावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मारुती संभाजी गालट( वय -४ ९, रा मु.किवळे पो.देहुरोड महालवाळे ता.हवेली जि.पुणे) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बिल्डर- विनोद तुकाराम आडस्कर ( रा. आकुर्डी पुणे) राठोड ठेकेदार (पुर्णनाव पत्ता माहित) बनसोडे ठेकेदार( पुर्णनाव पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दिनांक 18 आॅक्टोबर रोजी सकाळी 10 च्या दरम्यान शितळादेवी मंदिराशेजारील आकुर्डी येथे बिल्डर- विनोद तुकाराम आडस्कर याची बांधकाम साईट चालू होती तेथे राठोड ठेकेदार, बनसोडे ठेकेदार म्हणून काम पाहतात
याच ठिकाणी फिर्यादी मारुती संभाजी गालट यांचा भाऊ शिवाजी संभाजी गालट( वय ४० वर्षे रा.दळवीनगर झोपडपटटी , रेल्वेलाईन शेजारी , चिंचवड , पुणे) हा आडस्कर बिल्डर यांचेकडे कामासाठी गेला होता तो कामावर असताना बांधकाम साईट वरुन काम करताना खाली पडून जखमी झाल्याने त्यास स्टार हॉस्पीटल आकुर्डी पुणे येथे उपचारकामी अॅडमीट केले त्यांचेवर उपचार चालू असताना तो सोमवार दि .२६ / १० / २०२० रोजी मत्यू झाला आहे . मयताचे मृत्यूस बिल्डर- विनोद तुकाराम आडस्कर, राठोड ठेकेदार, बनसोडे ठेकेदार हे आहेत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.