बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पञकारीता ही सामाजिक सेवा आहे, पैसै कमविण्याचे साधन नाही – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

पिंपरी (वास्तव संघर्ष) पत्रकारिता ही सामाजिक सेवा आहे.परंतु सध्याच्या काळात त्याचा व्यवसाय झाला आहे.कोणत्याही सेवाक्षेत्राचा दुरुपयोग करू नये. मात्र सध्याची पत्रकारिता ही मालकांच्या दावणीला बांधली गेली आहे.यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारी पत्रकारिता टिकविण्याचे आव्हान पत्रकारांच्यासह समाजाचेही आहे. असे परखड मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

दर्पणकार आचार्य बाळकृष्ण शास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले व पत्रकार दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये शिवाजीराव शिर्के, मधू जोशी, माधवराव सहस्त्रबुद्धे, राजन वडके या ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व महापौर माई ढोरे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांच्यासह शहरातील पत्रकार उपस्थित होते.

यावेळी पोलीस आयुक्तांनी स्वतः वर्तमानपत्रांमध्ये संपादक म्हणून काम केल्याचे सांगितले . महापौरांनी पत्रकारिते बरोबरच जाहिरातीही महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. नाना कांबळे यांनी प्रास्ताविक तर दादा आढाव यांनी आभार मानले.

Share this: