बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

कोरोना व्हायरस :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पन्नास लाखांचे सुरक्षा कवच

पिंपरी(वास्तव संघर्ष) :- कोरोना कोवीड १९ वर नियंत्रण मिळविण्यासाठी व त्याचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.ही जबाबदारी पार पाडत असतांना त्यांचा प्रत्यक्ष कोरोनाग्रस्त रूग्णांशी संपर्क येत आहे.त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच योजनेअंतर्गत कोरोना संसर्ग होवून दिवंगत झाल्यास त्यांच्या वारसांना राष्ट्रीय स्वास्थ्य योजनेअंतर्गत पन्नास लाख,महापालिका कामगार निधीतून पंचवीस लाख रूपयांचे अर्थसहाय्य व त्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आली.या योजनेची मुदत ३० मार्च पासून ९० दिवसांपर्यत असणाऱ आहे

तसेच वारस नोकरी न घेतल्यास अतिरिक्त पंचवीस लाख रूपये देण्यात येणार आहेत.कोरोना विषाणू कोवीड १९ प्रतिबंध व उपद्रव याकामी महापालिकेकरीता सेवा देणारे कंत्राटी व मानधनावरील कामगारांना या योजनेत सामावून घेण्यात आले असून त्यांचेही कोरोना प्रादू्र्भावामुळे निधन आल्यास त्यांचे वारसांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन अंतर्गत पन्नास लाख रूपये व महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त२५ लाख रूपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.त्याबाबतचे आदेश आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निर्गत केल्याचेही त्यांनी सांगितले.
या योजनेच्या अंमलबजावणीचे अधिकार आयुक्त व कामगार कल्याण निधी समितीला देण्यात आले आहेत.

Share this: