कोरोना व्हायरस : पिंपरी चिंचवडमधील खराळवाडी, दिघी, थेरगाव, चिखली परिसर सिल
पिंपरी(वास्तव संघर्ष) – पिंपरी-चिंचवड शहरात आटोक्यात येत असलेला “करोना’चा प्रादुर्भाव अचानकच वाढला आहे. करोना बाधित रुग्ण आढळल्याने आणि संसर्ग वाढण्याची शक्यता पाहता पिंपरी-चिंचवड शहरातील काही भाग “ सील’ करण्यात आल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे .
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील खराळवाडी, चिखली परिसरातील घरकुल वसाहतीमधील पाच इमारती, पडवळनगर थेरगाव, दिघी हे काही भाग ‘ सील’ करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा , २००५ प्रमाण संभाव्य हाणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मानवी आरोग्याला व जीविताला धोका निर्माण होण्याचा संभव आहे . याकरीता कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे आदेश लागू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे .
तरी साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ ( एपिडमिक ऍक्ट ) मधील तरतुदींनुसार , पिंपरी चिंचवड शहरातील खालील नमुद परीसर सील करणे आवश्यक आहे आज बुधवार , दि . ०८ एप्रिल , २०२० रोजी मध्यरात्री बारा वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे .
१ . घरकुल रेसीडेन्सी – बिल्डींग क्र . ए १ ते २० चिखली , ( पवार इंडीस्ट्रीयल परीसर – नेवाळे वस्ती )
२ . जामा मस्जिद , खराळवाडी या भोवतीचा परीसर , पिंपरी ( गिरमे हॉस्पीटल – अग्रेसन लायब्ररी – क्रिश्ना ट्रेडर्स – चैताली पार्क हौसिंग सोसायटी – खराळआई गार्डन – ओम हॉस्पीटल – ओरीयंटल बँक सीटी प्राईड हॉठिल – क्रिस्टल कोर्ट हॉटेल – गिरमे हॉस्पीटल )
३ . कमलराज बालाजी रेसीडन्सी , रोडे हॉस्पीटल जवळ , दिघी , भोसरी ( रोडे हॉस्पीटल – एसव्हीएस कॉम्प्युटर – स्वरा गिप्ट शॉपी – साई मंदीर रोड – अनुष्का ऑप्टीकल शॉप – रोडे हॉस्पीटल )
४ . शिवतीर्थ नगर , पडवळनगर थेरगाव ( शिरोळे क्लिनिक – गणेश मंदीर – निदान क्लिनिक – किर्ती मेडीकल – रेहमानिया मस्जिद – ऑर्कीड हॉस्पीटल – अशोका सोसायटी रोडवरील गणपती मंदीर ते शिरोळे क्लिनिक )
त्यानुसार सदर परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करण्यात येत आहे . सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क अथवा घरगुती स्वच्छ धुतलेला कापडी रुमाल लावणे बंधनकारक करण्यात येत आहे . तसेच आदेशामधील निबंधातून जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याच्या व्यक्तींना , कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी व वाहने व शासकीय व सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना वगळण्यात येत आहेत . तरी नागरिकांना सहकार्य करावे या करीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आवाहन केले आहे .