बातम्यामहाराष्ट्र

कोरोना व्हायरसमुळे पुण्यात अजुन दोघांचा मृत्यू ;पुण्यात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

पुणे (वास्तव संघर्ष) – पुण्यातील रविवार पेठ येथील एका 44 वर्षीय कोरोना रुग्णाचा आज ( बुधवारी ) महापालिकेच्या डॉ . नायडू सांसर्गिक रुग्णालयात मृत्यू झाला.  तसेच पुण्यात मंगळवारी एकाच दिवशी तीघांचा मृत्यू झाला होता. मरण पावलेल्या संशयिताचा कोरोना निदान चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे . त्यामुळे पुणे शहरातील कोरोना बळींची संख्या  10 झाली आहे . या व्यतिरिक्त ससून सर्वोपचार रुग्णालयात आणखी एका संशयित रुग्णांचाही मृत्यू झाला आहे . त्याच्या कोरोना निदान चाचणीचा अहवाल अजून प्राप्त झालेले नाही .

  डॉ . नायडू सांसर्गिक रुग्णालयात  एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे . आतापर्यंत या रुग्णालयात 150 रुग्ण आहेत . डॉ . नायडू हॉस्पिटलमध्ये रुग्णांची क्षमता संपली आहे . त्यामुळे महापालिकेच्या बोपोडी येथील रुग्णालयात रुग्णांना हलविले जात आहेत . आतापर्यंत शहरात मरण पावलेल्या कोरोनाबाधितांना श्वसनाचा त्रास , उच्च रक्तदाब , किडनी अथवा मधुमेहाचा त्रास असल्याचे आढळून आले आहे . त्यामुळे हे आजार असलेल्या रुग्णांनी कोरोनापासून स्वतः वाचविण्यासाठी विशेष काळजी घ्यावी , असे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे .

Share this: