काळाखडक झोपड्पट्टीधारकांचा एसआरए पुनर्वसनला तिव्र विरोध
वाकड(वास्तव संघर्ष) :काळाखडक झोपड्पट्टीधारकांच्या वतीने आज एसआरए चा विरोध करण्यासाठी काळाखडक येथे निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंदर्भात नागरिकांचा विरोध असल्याबाबतचे ५०० सह्यांचे पत्र अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांना देण्यात आले होते. आजच्या बैठकीत नागरिकांनी अनेक अडचणी मांडल्या.
निरक्षर महिलांना , खोटी माहिती देऊन , भीती दाखवून संमती घेऊन दिशाभूल व फसवणूक केल्याचे सांगितले . तसेच पोलीस बाळाचा वापर करून नागरिक , महिला , कार्यकर्त्यांना सोबत उद्धट वर्तन करून , गुन्हे दाखल करण्याची धमकी देत बेकायदेशीर सर्व्हे करण्यात आला असे सांगितले . यावेळी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष यांनी सांगितले कि, नागरिकांचा SRA प्रकल्पाला विरोध असेल तर , बिल्डर व प्रशासन जबरदस्ती का करत आहे ? कायदा हा लोकांसाठी आहे , त्यामुळे लोकांच्या भावनेचा व मागणीचा विचार झाला पाहिजे . विकसकाकडून कुठल्याही प्रकारची लेखी हमी घेतली जात नाही . पैशाच्या व गुंडगिरीच्या जोरावर प्रकल्प रेटून नेला जातो . त्यामुळे एस आर ए कार्यालयाच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराविरोधात मोर्चा काढणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यामध्ये
१) नागरिकांचा विरोध असताना , पोलीस बाळाचा वापर करून झालेला , बेकायदेशीर सर्व्हे रद्द करा .
२) गोर गरीब कष्टकरी दलित , मागासवर्गीय नागरिक , निरक्षर महिलांना , खोटी माहिती देऊन , भीती दाखवून संमती घेऊन दिशाभूल व फसवणूक केल्या बाबत विकसकावर कारवाई करा .
३) बनावट दस्तऐवज द्वारे , खोटी माहिती देऊन पात्रता यादी बनवणाऱ्या तहसीलदार , नायब तहसीलदार सूर्यकांत पठाडे , सर्व्हेक्षक यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी.
४) काळाखडक , वाकड सर्व्हे १२४ पैकी येथील जागेच्या खरेदी विक्री प्रक्रियेची चौकशी करा
वरील मागणीसाठी हजारोंच्या संख्ने लोकशाही पद्धतीने संविधान मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी अपना वतन संघटनेचे शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा , महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर , संघटक प्रकाश पठारे , विशाल गायकवाड , तौफिक पठाण यांच्यासहित काळाखडक येथील नागरिक ,महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते .