बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

सांगली पूरग्रस्तांसाठी शेखर ओव्हाळ युवा मंचची मदत ; रेस्क्यू टीमसह खाद्यपदार्थ, पाण्याचे बॉटल्स रवाना

पिंपरी(वास्तव संघर्ष) – शेखर ओव्हाळ युवा मंच सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले. या पूरग्रस्तांसाठी  खाद्य पदार्थांचे जिन्नस, पाण्याच्या बॉट्लसह नऊ तरुणांची रेस्क्यू टीम नुकतीच सांगलीला रवाना झाली आहे. 

सांगली, सातारा आणि कोल्हापूर भागात मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून सद्या तेथील पुरग्रस्तांची परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक लोक बेघर झाले आहेत. खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते शेखर ओव्हाळ यांनी पुढाकार घेतला आहे. युवा मंचच्या माध्यमातून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रेस्क्यू टीम सांगलीच्या आष्टा या गावी रवाना झाली. त्यांच्यासमवेत खाद्यपदार्थांचे जिन्नस आणि पाण्याचे बॉटल्स पाठविण्यात आले आहेत. या पथकात धीरज शिंदे, सुशील मोगरे, सैफ सय्यद, योगेश गव्हाणे, राज पवार, प्रशांत जळकुटे, नंदू अहिरे, सिद्धाप्पा धोबी, शुभम जगदाळे यांचा समावेश आहे. 

याबाबत बोलताना शेखर ओव्हाळ म्हणाले कि पूरग्रस्त सध्या मोठ्या बिकट अवस्थेत आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळण्याची गरज आहे. माणुसकीचा धर्म पाळायची हीच वेळ आहे. सगळेच आपले बंधू- भगिनी आहेत. या संकटकाळात आपण त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिले पाहिजे. या विचारातूनच सांगली भागातील आष्टा या गावी काही तरुणांना पाठविले आहे. यापुढेही युवा मंचातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही ओव्हाळ यांनी सांगितले. या मदतकार्यात ज्या तरुणांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी शेखर ओव्हाळ युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन ओव्हाळ यांनी केले. 

Share this: