बातम्या

पुरग्रस्तांसाठी दत्ताकाका साने स्पोर्ट्स सरसावले ;जेवण आणि गरजेच्या वस्तू घेऊन सांगलीला रवाना

पिंपरी (वास्तव संघर्ष) पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे सांगली आणि कोल्हापूर शहर अक्षरश पाण्याखाली गेले. मोठ्या प्रमाणात येथे वित्तहानी झाली आहे. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे .अनेक शहरातून पुरग्रस्तांना मदत होत असून पिंपरी-चिंचवड मधून दत्ताकाका साने स्पोर्ट्स फाऊंडेशन यांनी सोशलमिडीयावर पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते . याची दखल घेत मोठी मदत पुरग्रस्तांसाठी आली आहे.

यावेळी पुरग्रस्त शहरातील नागरिकांनी दोन टेम्पो भरून अन्न, पाणी, धान्य, मेडिसिन १० हजार चपाती, शेंगदाणे चटणी खर्डा, लोणचे कपडे अशी मदत आली. त्यामुळे आज दि. ११ आॅगस्ट रोजी दुपारी ३ च्या दरम्यान मोरेवस्ती चिखली येथून मा. विरोधीपक्षनेते दत्ताकाका साने आणि त्यांच्यासमवेत दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते सांगलीला रवाना झाले आहेत.

दरम्यान दत्ताकाका साने स्पोर्टस् फाऊंडेशन, विर अभिमन्यू फ्रेंडस् सर्कल आणि चिखली महिला बचत गटाची या कामी खुपच मदत झाली असे दत्ता काका साने म्हणाले.

Share this: