बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

झुंज दिव्यांग संस्थेच्या मागणीला यश;दिव्यांगांच्या सामुदायिक विवाह सोहळ्यास पाच लाखांचे अर्थसाह्य

पिंपरी (वास्तव संघर्ष): दिव्यांगांचे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थांना महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दरवर्षी 5 लाखांचे अर्थसाह्य देण्याची नवीन योजना सुरू केली आहे.

समाज विकास विभागाच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. झुंज दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू हिरवे यांच्या वतीने दरवर्षी दिव्यांगांचे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. गेल्या सात वर्षांत 52 विवाहे सोहळे झुंज दिव्यांगसंस्थेने आयोजित केले आहे. या सोहळ्यास महापालिकेने अर्थसाह्य करावे, अशी मागणी  संस्थेने केली होती.या मागणीला आता यश मिळाले आहे.

मानव हिताच्या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या सार्वजनिक संस्था व सार्वजनिक ट्रस्ट यांना अनुदान देण्याच्या योजनेच्या धर्तीवर दिव्यांगांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थांना दरवर्षी 5 लाखांचे अर्थसाह्य देण्याचा प्रस्ताव समाज विकास विभागाने स्थायी समिती व सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. त्यांना आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

Share this: