महापौर उषा ढोरे आमदार जगतापांच्या ‘ रिमोट कंट्रोल ‘ ने सभागृह चालवितात-राहूल कलाटे
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी – चिंचवडच्या महापौर उषा ढोरे दादागिरीने सभागृह चालवितात . हेतुपुरस्सरपणे मला बोलू देत नाहीत . शिवसेनेचा गटनेता असून देखील बोलण्यापासून रोखले जाते . हे जेव्हा माई ढोरे या महापौर झाल्यात त्या दिवसापासून सुरू आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सांगण्यानुसारच महापौर मला टार्गेट करतात . महापौर ढोरे आमदार जगतापांच्या ‘ रिमोट कंट्रोल ‘ ने सभागृह चालवितात , असा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केला .
एक महिला म्हणून आम्ही माईचा आदर करतो मात्र महापौर म्हणून त्यांनी असे वागणे शोभत नाही असे ही कलाटे म्हणाले, पिंपरी – चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा आज ( बुधवारी ) पार पडली . महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या . विषयपत्रिकेवरील करवाढीच्या प्रस्तावर महासभेत चर्चा सुरु होती . मात्र सभागृहात बोलू दिले नसल्याने राहुल कलाटे यांनी पाण्याचा ग्लास टेबलावरुन खाली फेकून देऊन महापौरांचा निषेध केला .
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कलाटे म्हणाले , अनुभवी असलेल्या उषा ढोरे महापौर झाल्यापासून महासभेत गोंधळ सुरु आहे . महापौरांची कामकाजाची पहिलीच सभा तहकूब झाली होती . दुसरी सभा देखील गोंधळातच तहकूब झाली होती . मागील काही सभा गोंधळातच पार पडत आहेत . त्यांच्याकडून दादागिरी केली जाते . महापौर ढोरे नव्हे तर आमदार लक्ष्मण जगताप सभागृह चालवितात . त्यांच्या रिमोट कंट्रोलवरच महापौरांकडून सभागृह चालविले जाते . राज्यातील सत्ता गेल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
महापौर या सर्व आमदारांच्या घरूनच शिकून पालिकेत येतात जसे आमदार सांगतील तसेच वागतात, करवाढीच्या महत्वाच्या विषयावर महापौर ढोरे यांनी मला बोलू दिले नाही . महापौरांच्या समोरील कुणालाही न विचारता रचना बदलली आहे . राजदंडापर्यंत पोहचू नये यासाठी फर्निचर बसवून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला .महापौर उषा ढोरे यांनी कलाटे यांचे आरोप फेटाळले . त्यांना पूर्वीच्या विषयावर बोलून दिले होते .असे त्यांनी सांगितले