पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्थायी समिति अध्यक्षांची ६ मार्चला निवड
पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर भाजपचे सहा व राष्ट्रवादीचे दोन अशा आठ सदस्यांची बुधवारी ( ता . २६ ) निवड झाल्यानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवडणूक कधी होणार? याबाबत पालिका वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या मात्र आता महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शुक्रवारी ( ता . ६ मार्च ) निवडणूक घ्यावी , असा आदेश विभागीय आयुक्त डॉ . दीपक म्हैसकर यांनी दिला आहे .
सभेच्या पीठासन अधिकारीपदी पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची नियुक्ती केली आहे , अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली . स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष विलास मडिगेरी यांची मुदत शनिवारी ( ता . २९ ) संपत आहे . त्यामुळे स्थायीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते , याकडे लक्ष लागले आहे . महापालिकेत भाजपची सत्ता फेब्रुवारी २०१७ मध्ये आली . तेव्हापासून सीमा सावळे , ममता गायकवाड व मडिगेरी यांनी अध्यक्षपद भूषविले आहे .