बातम्या

पिंपरी चिंचवड मधील पाच रुग्ण झाले करोनामुक्त ;बारापैकी आता फक्त चार रूग्ण कोरोनाबाधित

File Photo

पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील तीन करोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आता आणखी पाच रुग्णांचे अहवाल आज सकाळी निगेटिव्ह आले आहेत. रुग्णालयात 14 दिवसांचे उपचार घेऊन बारापैकी आठ रुग्ण ‘ कोरोनामुक्त होत ठणठणीत बरे झाले आहेत.

आज पाच रुग्णांच्या दुस – या चाचणीचे रिपोर्ट ‘ निगेटिव्ह ‘ आले असल्याने त्यांना ‘ डिस्चार्ज देण्यात येणार आहे . तीन दिवसात आठ रुग्ण ‘ कोरोनामुक्त झाल्याने शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी झाला आहे . तर , आणखी एका रुग्णाचे पहिले रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत . आता केवळ चार कोरोना बाधित रुग्ण आहेत .पिंपरी चिंचवड शहरातील तीन करोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.

शुक्रवारी पाच जणांचे उपचारानंतरचे घशातील द्राव तपासणीसाठी एनआयव्ही कडे पाठवण्यात आले होते. त्याचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. आता दुसऱ्यांदा तपासणीसाठी त्यांचे घशातील द्राव एनआयव्ही कडे पाठवले त्याचाही तपासणी अहवाल आज सकाळी निगेटिव्ह आला. हे अहवाल निगेटिव्ह आल्याने ते पाचजण करोनामुक्त झाले आहेत . या पाच जणांमध्ये थायलंडहून आलेल्या एका व्यक्तीचाही समावेश आहे.

दरम्यान, लाॅकडाऊन केल्यानंतर मागील आठ दिवसात शहरात एकही नवीन पॉझिटीव्ह ‘ रुग्ण आढळला नाही . ही आनंदाची बाब मानली जात आहे.

Share this: