बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या महाअधिवेशनात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या नवीन झेंड्याचे अनावरण केले. मनसेचा हा झेंडा भगव्या रंगाचा असून, त्यावर राजमुद्रा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी प्रशासनाचे प्रतिनिधित्व करणारी ही राजमुद्रा रयतेच्या राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करणारी आहे. राजकीय पक्षाने तिचा वापर करणे गैर आणि चुकीचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, मनसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. तसे निवेदन पोलीस ठाण्यात दिले आहे. 

मुंबईत मनसेचे राज्यव्यापी अधिवेशनात झेंड्याचे अनावरण झाले हा झेंडा भगव्या रंगाचा असून, त्यावर राजमुद्रा आहे. त्याच्याखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे लिहिण्यात आले आहे. मात्र, मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा छापण्याला संभाजी ब्रिगेडनं विरोध केला आहे. त्यांनी मनसेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Share this: