बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

व्यावसायिक झाले रस्त्याच्या समस्येला हैराण ;औद्योगिक वसाहती मधील सर्व रस्ते लवकरच पूर्ण करणार – मा. महापौर राहुल जाधव

चिखली (वास्तव संघर्ष) :प्रभाग क्रमांक – २ मधील कुदळवाडी – पवारवस्ती औद्योगीक वसाहत परिसरातील सर्व अंतर्गत रस्ते लवकरात लवकर पूर्ण करणार अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे मा. महापौर तथा प्रभाग क्रमांक -२ चे विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांनी आमच्या प्रतींनिधशी बोलताना संगितले प्रभाग क्रमांक-२ जाधववडी- चिखली-मोशी मधील कुदळवाडी- पवारवस्ती मधील औद्योगीक वसाहती मध्ये अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांचे कारखाने आहेत.

परंतु गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणच्या व्यावसायिकांना रस्त्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते या संदर्भात या भागातील व्यावसाईकांनी . मा.महापौर विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांच्या कडे निवेदना द्वारे या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली होती. तत्काल जाधव यांनी आज महानगर पालिकेच्या अधिकार्‍यां समवेत या भागाचा पाहणी दौरा केला आणि लवकरात लवकर या भागातील सर्वच्या सर्व रस्ते पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

यावेळी बोलताना राहुल जाधव यांनी संगितले की, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा शहर अध्यक्ष पै.महेश लांडगे यांच्या सहकार्याने या भागातील रस्ते विकाससाठी निधि मंजूर करून घेण्यात आला आहे. परंतु कोरोंनाच्या संकटामुळे मागील काही दिवसांपासूम महानगर पालिकेची विकास कामे बंद होती तसेच बरेचसे मजूर आपापल्या गावी परत गेले असल्या मुले मनुष्यबळा अभावी या कामासाठी वेळ लागला आहे. परंतु आता परिस्थिति पूर्व पदावर येत असून लवकर च या रस्त्यांची कामे पूर्ण होतील यावेळी महानगर्पालिकेचे अधिकारी तसेच अनेक व्यवसाइक उपस्थित होते.

Share this: