धक्कादायक : पहाटे घरात घुसून झोपेत असताना आरोपीने केला खून ;वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) काळेवाडीतील नढेनगर याठिकाणी शुक्रवारी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान छाया पांडुरंग गुंजाळ यांचा झोपेत असताना अज्ञात आरोपींनी खून केला आहे तसेच शेजारी झोपलेल्या मंगल साहेबराव सत्वधर यांना देखील मारहाण करून जखमी केले आहे. ही घटना शुक्रवारी दि (16)रोजी पहाटे घडली आहे.

संतोष पांडुरंग गुंजाळ (वय -३२ वर्षे धंदा – पान टपरी रा.तुळजाभवानी कॉलनी , जगदंबा पान स्टॉल मागे , नढेनगर नगर , काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी संतोष गुंजाळ यांची आई छाया पांडुरंग गुंजाळ (वय ५० वर्षे ( मयत ) , सासु मंगल साहेबराव सत्वधर ( जखमी ) , वडील पांडुरंग गुंजाळ व सुंदाराबाई भानुदास गुंजाळ असे चार जण घराचे हॉलमध्ये झोपलेले असताना फिर्यादी संतोष गुंजाळ यांची आजी सुंदाराबाई भानुदास गुंजाळ ही नेहमीप्रमाणे पहाटे ०४.०० वाजणेचे सुमारास घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवुन भाजी विक्रीसाठी गेली असता , त्या अर्धवट उघडया दरवाजावाटे अज्ञात इसमाने घरामध्ये प्रवेश करुन अज्ञात हत्याराने अज्ञात कारणास्तव फिर्यादी संतोष गुंजाळ यांची आई छाया पांडुरंग गुंजाळ हिस मारहाण करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे .

त्याच वेळी मयत छाया पांडुरंग गुंजाळ यांच्या बाजुस झोपलेली फिर्यादी संतोष गुंजाळ यांची सासु मंगल साहेबराव सत्वधर हिला देखील अज्ञात इसमाने अज्ञात हत्याराने अज्ञात कारणास्तव जिवे ठार मारण्याचे उदेशाने मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे .अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Share this: