क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सामाजिक सुरक्षा पथकांची कामगिरी ; अवैध मटका जुगार अड्यावर पोलिसांचा छापा

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील अवैध धंद्यास प्रतिबंध करण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिल्यानंतर चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत महाळुगे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये इंद्रायणी नदीकाठी येलवडी , देहुगाव येथे अवैधरित्या कल्याण मटका जुगार खेळणाऱ्यावर पोलीसांनी छापा टाकून आरोपींकडून रोख रक्कम रू ५१,३३० / – तसेच १८,०२० / – जुगार खेळण्याचे साहित्य व मोबाईल असे एकूण ६ ९ , ३५० / – असा मुद्देमाल जप्त केला आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने सदरील कारवाई केली आहे.

चालक – मालक अनिल घोगरे, सागर गोरे तसेच मुळ मालक निलू (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) तसेच दिनेश बलदानी व इतर १० आरोपीविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हयाचा पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत महाळुगे पोलीस चौकीकडे वर्ग करण्यात आला आहे .

सदर कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उप – आयुक्त सुधीर हिरेमठ , सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील , वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विठ्ठल कुबडे , पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे सपोनि डॉ अशोक डोंगरे , सपोफौ विजय कांबळे , पोहवा सुनिल शिरसाट , पोना अनिल महाजन , मपोना वैष्णवी गावडे , पोशि मारुती करचुंडे , पोशि गणेश कारोटे , पोशि योगेश तिडके , पोशि . राजेश कोकाटे यांनी केली आहे .

Share this: