पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी विजयी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी अखेर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांची निवड झाली आहे. मडिगेरी यांना 12 मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांना 4 मते मिळाली. शिवसेनेचे मत मडिगेरी यांना मिळाले.
स्थायी समिती सभापती पदासाठी नगरसेवक विलास मडिगेरी यांना भाजपची उमेदवारी दिली होती. त्यामुळे भाजपचेच विजय उर्फ शितल शिंदे यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आपला अर्ज भरला होता. शेवटी शिंदे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे विलास मडिगेरी यांची सभापती पदी निवड झाली आहे.