Breaking रहाटणीत भरदिवसा सराफ व्यापाऱ्यांवर गोळीबार
पिंपरी (वास्तव संघर्ष ):वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका सराफ व्यापाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. लूटमारीसाठी आलेल्या चार चोरट्यांनी सराफावर गोळीबार करत सोन्या चांदीचे दागिने लुटून नेले. ही रहाटणीतील कोकणे चौक परिसरातील पुणेकर ज्वेलर्स येथे घडली
दिव्यांग प्रदीप मेहता (वय २४ रा. रहाटणी) असे जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास चार चोरटे दुकानात आले. त्यांनी दुकानाचे शटर आतून लावून घेतले. आतमध्ये असलेल्या दिव्यांग यांच्या पायावर गोळी मारत दुकानातील सोन्या चांदीचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.t